पावसाचा चुकीचा अंदाज वर्तवणारे, बोगस हवामान खाते बंद करा

मुंबई :  रायगड माझा वृत्त 

हवामान खात्याने यंदा सरासरी इतका म्हणजेच चांगला पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला होता. हवामान खात्याच्या भरवशावर राहून आम्ही पेरण्या केल्या. पण प्रत्यक्षात मात्र पाऊसच पडला नाही. उभी पिके करपून गेली. पावसाचा चुकीचा अंदाज वर्तवणाऱया हवामान खात्यावर करोडो रुपये खर्च करण्यापेक्षा हे खातेच बंद करून टाका, अशी मागणी शेतकऱयांनी राज्य शासनाकडे केली. पुण्यातील हवामान खात्याच्या कार्यालयावर मराठवाडय़ातील शेकडो शेतकऱयांनी आज धडक दिली. बंद करा! बंद करा! हवामान खाते बंद करा! अशा घोषणांनी शेतकऱयांनी हवामान खात्याच्या परिसर दणाणून सोडला. बीडच्या माजलगाव शेतकरी संघर्ष समितीने हे आंदोलन आयोजित केले होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत