पावसाच्या जोरामुळे मातीच घर कोसळून सहा जण ढिगाऱ्याखाली दबले

जळगाव: रायगड माझा वृत्त 

पारोळा तालुका परिसरात शनिवारी (ता.20) सायंकाळी सर्वत्र समाधानकारक पाऊस झाला. या पावसामुळे शेवगे बुद्रुक येथील पाटील कुटुंबीय हे आज शेतात काम नसल्याने घरीच होते. घरातील सर्व सदस्य घरात बसलेले असताना सकाळी साडेअकराच्या सुमारास अचानक वाल्मिक पाटील यांच्या घराचे मागच्या बाजूचे चार चष्म्यांचे मातीचे घर कोसळले.

शेवगे बु. (ता.पारोळा) येथे काल झालेल्या जोरदार पावसाने गावातील मातीचे घर पडून एकाच कुटुंबातील सहा जण दाबले गेल्याची घटना आज सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. घर कोसळण्याचा मोठा आवाज झाल्याने गावात पळापळ सुरू होऊन मिळेल; यात गं.भा. कल्पनाबाई पाटील (वय 49), सागर पाटील (वय16), कविता पाटील (वय24), ललित पाटील (20), वाल्मीक पाटील (22), छबाबाई पाटील (70) असे सहाही जण दाबले गेले. मातीच्या ढीगाऱ्यात दबल्या गेलेल्या सहा जणांपैकी कल्पना पाटील, ललित पाटील, वाल्मीक पाटील हे गंभीर जखमी असून, त्यांना प्रथमोपचार करून पुढील उपचारार्थ धुळे येथे हलविण्यात आले आहे. तर अन्य जखमींवर डॉ. योगेश साळुंखे, परिचारिका सरला पवार, डॉ. अंजली पाटील, दीपक सोनार, राजू वानखेडे आदींनी उपचार केले.

त्या साहित्याने गावातील तरुणांनी मातीचा ढिगारा उपसत जखमींना बाहेर काढले रुग्णवाहिकेत डॉ. सुनील पारोचे, प्रमोद सूर्यवंशी यांनी पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले. सदरची घटना रात्री घडली असती, तर मोठा अनर्थ झाला असता.  यात सर्वजण गंभीर जखमी झाले असून रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.यावेळी तहसीलदार अनिल गवांदे, पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे, हवालदार काशिनाथ पाटील, अनिल वाघ, मंडलाधिकारी पी. ए. पाटील, प्रदीप गांगुर्डे, शहर तलाठी निशिकांत पाटील, भैय्या निकम, बी. टी. पाटील आदींनी भेटी दिली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत