पावसाळी अधिवेशनात सरकारला कोंडीत पकडण्याची विरोधकांची जय्यत तयारी, सर्वाधिक लक्षवेधी दाखल

नागपूर :रायगड माझा

रायगड माझा राज्य विधिमंडळाच्या येत्या बुधवारपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारला घेरण्यासाठी विरोधकांनी आयुधे परजली असून केवळ तीन आठवडे चालणाऱ्या या अधिवेशनासाठी 15 हजारांवर तारांकित प्रश्‍न व अडीच हजारावर लक्षवेधी सूचना विधिमंडळ सचिवालयाकडे आल्या आहेत. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी विधानसभा आणि विधान परिषदेच्या सदस्यांकडून एकूण अडीच हजारावर लक्षवेधी सूचना प्राप्त झाल्या आहेत. सर्वाधिक लक्षवेधी सूचना या विधान सभेच्या सदस्यांकडून सादर झाल्या आहेत.

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी 27 जूनपासून लक्षवेधी सूचना स्विकारण्याला सुरवात झाली. विधान सभा व विधान परिषदेच्या सदस्यांकडून अशा एकून अडीच हजारावर लक्षवेधी सूचना संबंधित खात्याला सादर झाल्या आहेत. ही संख्या पुढे आणखी वाढण्याची शक्‍यता आहे. तातडीच्या जनहिताच्या मुद्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी विधान सभा आणि विधान परिषदेच्या सदस्यांना त्या त्या लक्षवेधी सूचना सभागृहात मांडता येतात.

विधानसभा व विधान परिषद सदस्यांनी जवळपास 15 हजारांवर तारांकित प्रश्‍न दिले आहेत. विधिमंडळ कामकाज समितीने आखलेल्या कामकाजानुसार विधिमंडळाच्या केवळ 13 बैठका होणार आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शेतकऱ्यांची कर्जमाफी, नागपुरातील कायदा व सुव्यवस्था या प्रश्‍नांवर विरोधक आक्रमक राहण्याची शक्‍यता आरहे. या काळात किती प्रश्‍नांची तड लागेल, हे काही दिवसातच स्पष्ट होणार आहे. शनिवारपर्यंत विधान सभेतील सदस्यांकडून आणि विधान परिषदेच्या सदस्यांकडून अशासकीय ठराव संबंधित विभागाला दिले गेले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत