पास वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास अटक-संभाजीनगर

संभाजीनगर : रायगड माझा वृत्त 

घरासमोर खेळत असलेल्या पाचवर्षीय मुलीस बळजबरीने दुचाकीवर बसवून गिरनेर तांड्यावर नेउâन तिच्यावर अत्याचार करणाऱ्या एका बांधकाम मजुराचा पोलिसांनी अतिशय कौशल्याने शोध लावला आहे. केवळ पाच वर्षे वय असलेली ही मुलगी अत्याचाराने अतिशय घाबरून गेलेली असतानाही पोलिसांनी तिला विश्वासात घेऊन आरोपीचा तर शोध लावलाच, शिवाय तिच्या आईवडिलांनाही शोधून काढत मुलीला आईवडिलांच्या ताब्यात दिले.

चिकलठाणा पोलिसांनी केला गुन्हा उघड
बिडकीनजवळील बन्नी तांडा येथील बंडू रोहिदास राठोड हा मजूर कामगार आहे. दोन दिवसांपूर्वी तो मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनजवळ राहण्यासाठी आला होता. सोमवारी दुपारी बंडू राठोड याने घरासमोर खेळत असलेल्या पाचवर्षीय मुलीला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून बळजबरीने दुचाकीवर बसवून नेले. विशेष म्हणजे तिच्या आईने प्रतिकारही केला होता. मात्र प्रतिकाराला दाद न देता राठोड दुचाकीवर बसवून तिला गिरनेर तांडा येथे घेऊन गेला. तेथे त्याने तिच्यावर बलात्कार केला आणि तिला तेथेच सोडून पळ काढला.

सकाळी मुलगी रडत असल्याने गावकऱ्यांनी घटनेची माहिती चिकलठाणा पोलिसांना कळवली. यावरून सहायक निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी उपनिरीक्षक सखू राठोडसह पथकाला सोबत घेउन गिरनेर तांडा येथून मुलीला ताब्यात घेत घाटीत नेले. डॉक्टरांनी या मुलीवर अत्याचार झाल्याचा पोलिसांना अहवाल दिला.

या प्रकरणी चिकलठाणा पोलिसांनी गुन्हा दाखल करून मुकुंदवाडी पोलिसांकडे वर्ग केला. दरम्यान, मुलीला बंडू राठोड घेऊन पळून गेल्याची तक्रार घेऊन मुलीचे आईवडील मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गेले असता पोलिसांनी त्यांना हा प्रकार आपल्या हद्दीत घडलेला नाही, असे म्हणत त्यांना पिटाळून लावले.

नराधमाचा मागही काढला
पीडित मुलीने नराधम राहत असलेले घरही दाखवले तेव्हा सहायक निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी बंडू राठोड याच्या घराची झडती घेतली असता, त्यात त्यांना गुत्तेदाराचे व्हिजिटिंग कार्ड सापडले. त्या कार्डावरून सत्यजित ताईतवाले यांनी मुकुंदवाडी पोलीस ठाण्याच्या डिटेक्टिव्ह ब्रँचच्या पथकाला करमाड येथे पाठवले. तेथील गुत्तेदाराच्या घरात त्यांना बंडू राठोड सापडला. त्यास ताब्यात घेऊन चिकलठाणा पोलीस ठाण्यात आणले असता पीडित मुलीने त्याला ओळखले. पोलिसांनी त्याला अटक केली. बंडू राठोड याचे लग्न झालेले असून त्याला तीन मुले आहेत.

पाच तासांच्या शोधानंतर सापडला घराचा पत्ता
पोलिसांनी गिरनेर तांडा येथून पीडित मुलीला ताब्यात घेतले तेव्हापासून ती सारखी रडतच होती. मुलगी अतिशय दहशतीत असल्यामुळे तिला सुरुवातीला स्वत:चे, आई वडिलांचे किंवा अन्य कुणाचेही नावसुध्दा आठवत नव्हते. त्यामुळे तिच्या आईवडिलांचा आणि आरोपीचा पत्ता शोधून काढण्याचे पोलिसांसमोर नवे आव्हानच होते. मात्र सहायक निरीक्षक ताईतवाले तसेच महिला उपनिरीक्षक सखू राठोड यांनी मुलीला अतिशय प्रेमाने, धीर देत तिला विश्वासात घेतले. प्रथम तिने कांचनवाडीत राहत असल्याचे सांगितले, नंतर ती पोलिसांना रेल्वेस्टेशन, चितेगाव परिसरात घेउन गेली. तिला आपल्या घराचा नीट अंदाजच येत नव्हता. परंतु पोलिसांनी चिकाटी सोडली नाही. दरम्यान मुलीने पोलिसांना मुकुंदवाडी परिसरात नेले. तिथे तिला आपले घर सापडले. तिने पोलिसांना घर दाखवले. घरात कोणीच नव्हते. तिचे आई वडील हर्सूल येथे गेलेले होते. ताइतवाले यांनी हर्सूल येथे जाऊन आईवडिलांना शोधून काढले आणि मुलीला त्यांच्या ताब्यात दिले. घर सापडल्यापासून तब्बल पाच तासाच्या अथक परिश्रमानंतर ताईतवाले यांनी मुलीला आईवडिलांच्या स्वाधीन केले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत