पिंपरीतील थेरगावमध्ये ट्रान्सफॉर्मरला आग

पुणे : रायगड माझा वृत्त

पिंपरीतील थेरगाव भागात लागलेल्या एका ट्रान्सफॉर्मरला आग लागली. या आगीत एक चारचाकी टेम्पो आणि एक दुचाकी जळून खाक झाली. ही पावणेनऊच्या सुमारास घडली. अग्निशमन दलाच्या दोन बंबांनी तातडीने येत ही आग नियंत्रणात आणली. आगीवर वेळीच नियंत्रण मिळवण्यात आल्याने मोठी हानी टळली. या ट्रान्सफॉर्मरच्या शेजारीच एक लाकडी वखार आहे. आगीचे लोट वखारीपर्यंत पोहचले असते तर आगीचा भडका उडाला असता. मात्र तसे होऊ न देता प्रयत्नांची शर्थ करत अग्निशमन दलाने ही आग नियंत्रणात आणली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत