पिंपरीत भूताची भीती दाखवत चार वर्षांच्या मुलीवर बलात्कार

पुणे : रायगड माझा वृत्त

पिंपरीत चार वर्षांच्या मुलीला भूताची भीती दाखवत निर्जनस्थळी नेत तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.

पिंपरीतील नागसेन झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या चार वर्षांच्या मुलीला मंगळवारी संध्याकाळी एका नराधमाने भूताची भीती दाखवत निर्जनस्थळी नेले. संध्याकाळी साडे सहाच्या सुमारास त्याने मुलीला निर्जनस्थळी नेले. यानंतर नराधमाने तिच्यावर बलात्कार केला. जवळपास अडीच तासानंतर पीडित मुलगी घरी परतली. घरी परतल्यावर तिने वडिलांना घडलेला प्रकार सांगितला. मुलीच्या वडिलांनी या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून पीडित मुलीवर सध्या ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पिंपरी पोलिसांनी या प्रकरणी संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. संशयित आरोपी हा तडीपार गुंड असल्याचे समजते. या प्रकरणी अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत