पिंपरी:रहाटणीत गोळीबार; व्यावसायिकाचा खून

पिंपरी : रायगड माझा 

रहाटणी येथील प्रभात कॉलनीच्या मुख्य रस्त्यावर व्यावसायिकाचा गोळ्या झाडून खून करण्यात आला. ही घटना काल रात्री पावणेबाराच्या सुमारास घडली.

अनिल रघुनाथ धोत्रे (वय ४४, रा. प्रभात कॉलनी, राहटणी) असे खून झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धोत्रे यांचे काळेवाडीतील पाचपीर चौकात ज्योती टूर्स अँड ट्रॅव्हल्स नावाचे दुकान आहे. रात्री नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी येत असताना त्यांच्यावर दुचाकीवर आलेल्या दोघांनी हल्ला केला. हल्ल्यानंतर शेजाऱ्यांनी त्यांना तात्काळ थेरगाव येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.

धोत्रे यांच्याकडे दररोज दुकानाची सुमारे दोन ते तीन लाखांची रोकड असायची. त्यामुळे चोरट्यांनी पाळत ठेऊन लुटीच्या उद्देशाने हा हल्ला केला असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच उपायुक्त गणेश शिंदे, सहायक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते यांच्यासह वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सतीश माने, निरीक्षक सुनील पिंजण यांच्यासह अधिकारी दाखल झाले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत