पिंपरी: गॅसगळतीमुळं घर पेटलं; ५ जखमी

 

पुणे: रायगड माझा वृत्त

स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरमधून गळती झाल्यानंतर स्फोट होऊन घराला भीषण आग लागल्याची घटना आज सकाळी पिंपरी-चिंचवडमधील कासारवाडीत घडली. या आगीत कुटुंबातील तीन मुलांसह पाच जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कासारवाडीत केशव नगरमधील गुरुनाथ कॉलनीत ही घटना घडली. बिरादार कुटुंब गाढ झोपेत होतं. त्यांच्या घरातील सिलिंडरमधून रात्रीपासूनच गॅस गळती सुरू होती. सकाळी आठच्या सुमारास स्फोट होऊन घराला आग लागली. सर्व जण झोपेत असतानाच ही आग लागली. कुणालाच तत्काळ घरातून बाहेर पडणं शक्य झालं नाही. या दुर्घटनेत शोभा बिरादार (वय ३०), गणेश बिरादार (वय ८), शुभम बिरादार (वय ५), देवांश बिरादार (वय ३), विजय जाधव (वय २२) हे जखमी झाले आहेत. त्यांना वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत