पिंपरी चिंचवडमध्ये पत्नीच्या जाचाला कंटाळून पतीची आत्महत्या, पत्नीला अटक

पिंपरी : रायगड माझा वृत्त

पत्नीच्या जाचाला कंटाळून जय देवीदास तेलवाणी (वय २५ , रा.श्री साई सोसायटी, मोरेवस्ती, चिखली) याने आत्महत्या केली.याप्रकरणी त्याची पत्नी तृप्ती जय तेलवाणी (वय२१) हिला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांचन देवीदास तेलवाणी (वय 40, रा. काळेवाडी) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी चिखली पोलिसांनी पत्नीस अटक केली आहे. तृप्ती जय तेलवाणी (वय २१) असे आरोपी महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पतीचा छळ करत त्याची मित्र मंडळींमध्ये बदनामी केली. त्यास कंटाळून पतीने आत्महत्या केली. मार्च २०१८ ते १३ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत फिर्यादी यांची सून तृप्ती हिने पती जय याचा वेगवेगल्या प्रकारे छळ केला. वारंवार पैशांची मागणी तसेच मित्रमंडळीत बदनामी होईल, अशा स्वरूपात छळ केला. पैसे न दिल्याने त्यास शिवीगाळ करत हाताने मारहाणही केली.
स्वत:च्या जीवाचे बरेवाईट करण्याची धमकी देत त्याना मानसिक तणावाखाली ठेवले. पतीला कॅन्सर झाला आहे, अशा टिक टॉक व्हिडिओ बनवून तो त्याच्या मित्रमंडळींना सोशल मीडियावर पाठवला. हा त्रास असह्य झाल्याने जय यांनी सोमवारी आत्महत्या केली. पोलीस उपनिरीक्षक रत्ना सावंत याबाबत अधिक तपास करीत आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत