पिंपरी चिंचवड मध्ये अडीच वर्षांच्या चिमुरडीचं अपहरण करून तिचा खून

पिंपरी: रायगड माझा वृत्त 

पिंपरी चिंचवड परिसरातील सांगवी भागात मंगळवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला आहे. सोमवारी सायंकाळी ती राहत्या घरातून बेपत्ता झाली. त्यानंतर तिच्या नातेवाईकांनी आजूबाजूच्या परिसरात सर्वत्र तिचा शोध घेतला.


पिंपळे सौदागर परिसरात असलेल्या कामगार वसाहतीमध्ये ही चिमुकली राहत होती. अडीच वर्षाच्या चिमुकलीचे अपहरण करून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली.  मंगळवारी सकाळी तिचा मृतदेह पिंपळे सौदागर येथील मिलिटरी परिसरास आढळून आला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

तिच्या सोबत काही गैरप्रकार झाला आहे का याची माहिती शवविच्छेदन अहवालात समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले.  सांगवी पोलीस घटनास्थळी पोहोचले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. चिमुकलीचे अपहरण करून खून केल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत