पीएमसी बँकेच्या खातेदारांची मातोश्रीवर निदर्शने; मुख्यमंत्र्यांनी केले आश्वस्त

मुंबई : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त 

पीएमसी बँकेच्या खातेदारांनी रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्यासमोर निदर्शने केली. त्यांनी या खातेदारांचे म्हणणे ऐकूण घेतले. खातेदारांना न्याय देण्यासाठी राज्य सरकार योग्य ती कार्यवाही करेल, असे मुख्यमंत्र्यांनी खातेदारांना आश्वस्त केले. खातेदारांना न्याय द्या, अशी मागणी या खातेदारांनी यावेळी केली.

पीएमसी बँकेच्या खातेदारांनी रविवारी वांद्रे येथील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानासमोर निदर्शने केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खातेदारांच्या प्रतिनिधींना मातोश्रीत बोलावून चर्चा केली. तसेच राज्य सरकार कोणत्याही परिस्थितीत खातेदारांना न्याय देईल, याबाबतची कार्यवाही तातडीने केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले असून खातेदारांना आश्वस्त केले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत