पुढच्या ४८ तासात इंटरनेट सेवा बंद होण्याची शक्यता

नवी दिल्ली : रायगड माझा वृत्त 

पुढचे ४८ तास युट्यूब, फेसबुक व्हॉटसअॅप सगळं बंद पडणार असून यामुळे इंटरनेटच्या आहारी गेलेली मंडळी भयंकर अस्वस्थ होण्याची दाट शक्यता आहे. रशिया टुडेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तात म्हटलं आहे की पुढचे दोन दिवस इंटरनेट वापरणाऱ्यांना Connection Failure हा एरर सातत्याने दिसण्याची शक्यता आहे.

इंटरनेटसाठी आवश्यक डोमेन आणि त्याच्याशी निगडीत माहिती जाळ्याची पायाभूत सुविधा आधुनिक करण्याचं काम करण्यात येणार आहे. द इंटरनेट कॉर्पोरेशन ऑफ असाईन्ड नेम्स एंड नंबर्स (ICANN) इंटरनेटसाठीच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठे बदल करणार आहे. यामध्ये माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी क्रिप्टोग्राफी यंत्रणा वापरण्यात येते त्यासाठीच्या आवश्यक बाबींमध्ये बदल करण्यात येणार आहे. वाढत्या सायबर हल्ल्यांना रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे.या बदलांमुळे पुढचे दोन दिवस वेबसाईट उघडणे किंवा इंटरनेटद्वारे व्यवहार करणं कठीण जाणार आहे. त्यामुळे जर महत्वाचे व्यवहार करायचे असतील तर ते आजच करून घ्या

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत