पुणेः ४ मुलांचा विनयभंग; क्रीडा शिक्षकाला अटक

पुणे : रायगड माझा वृत्त 

विद्यार्थ्यांना लैंगिकतेची जाणीव व्हावी या उद्देशाने चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श शिकवत असताना ४ मुलांचा विनयभंग केल्याप्रकरणी एका क्रीडा शिक्षकाला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे.

हडपसर येथील एका इंग्रजी माध्यमातील शाळेत हा प्रकार उघडकीस आला आहे. शाळेत गेल्या सात वर्षापासून क्रीडा शिक्षक म्हणून काम करणाऱ्या ४० वर्षीय शिक्षकाने गेल्या पाच महिन्यांपासून लैंगिकतेचे धडे देताना अश्लिल भावनेतून नववीत शिकणाऱ्या ४ मुलांचा लैंगिक छळ सुरू केला होता. लैंगिकतेचे धडे देताना चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श असे शिकवताना या शिक्षकाने मुलांना वाईट हेतूने तसेच त्यांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल या पद्धतीने स्पर्श केला. गेल्या पाच महिन्यांपासून हा प्रकार सुरू आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमात या शिक्षकाने चार मुलांचा लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे.

विद्यार्थ्यांच्या तक्रारीवरुन हडपसर पोलिसांनी या क्रीडा शिक्षकाला अटक केली आहे. या शिक्षकाला आज कोर्टात हजर करण्यात येणार असल्याची माहिती माहिती पोलीस निरीक्षक सुनील तांबे यांनी दिली. आम्ही यासंबंधी पुरावा गोळा केला असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती तांबे यांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून अशा घटना उघडकीस आल्या आहेत. सप्टेंबर महिन्यात फातिमानगरमधील एका नावाजलेल्या शाळेच्या मुख्याध्यापकाला १४ वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आल्याची माहितीही तांबे यांनी यावेळी दिली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत