पुणेरी पगडीवरून कोणाचेही मन दुखवण्याचा हेतू नव्हता-शरद पवार

पुणे : रायगड माझा वृत्त 

छत्रपती हे एकच असतात त्यामुळे ती पगडी वापरता येत नाही. मी पुण्यात वाढलो आहे याचा मला अभिमान आहे. महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज हे माझा आदर्श आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात मी फुले पगडीचा आग्रह धरला. मात्र यातून कोणाचेही मन दुखावण्याचा हेतू नव्हता असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात दिले.

पुणे महानगरपालिकेच्या वतीने पद्मावती येथील डॉ. कदम डायग्नोस्टिक सेंटर आणि स्वामी विवेकानंदचे भिंती शिल्पाचे उदघाटन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी कामगार नेते बाबा आढाव, महापौर मुक्ता टिळक, खासदार वंदना चव्हाण,विरोधी पक्षनेते चेतन तुपे आणि स्थानिक नगरसेविका अश्विनी कदम,नितीन कदम,सुभाष जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.

तीन दिवसांपूर्वी पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात शरद पवार यांनी यापुढे फुले पगडीनेच स्वागत करायचे असा आदेशच दिला होता. मात्र त्यांच्या या आदेशावरून प्रसारमाध्यमात बरीच चर्चा आणि टीकाही झाली. तसेच शरद पवार यांनी असे वक्तव्य का केले याबाबतही चर्चा रंगल्या. त्या चर्चांना पूर्णविराम मिळावा म्हणून शरद पवारांनी आजच्या कार्यक्रमात स्पष्टीकरण दिले.

यावेळी शरद पवार म्हणाले की, समतेचा परिवर्तनाचा आणि विज्ञानाचा पुरस्कार करणाऱ्या महात्मा फुले यांचा विचार पुढे नेण्याची ही सामाजिक आणि राष्ट्रीय गरज आहे.सातारा आणि कोल्हापूर छत्रपती आहेत.छत्रपती एकच असतात.शाहू महाराजाची पगडी सामान्याना उपलब्ध होत नाही.तर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी परदेशात हॅट वापरली असेल मात्र दैनंदिन जीवनात टोपी घालत नव्हते.म्हणून सर्वांसाठी महात्मा फुले यांचे पागोटे घातल्याचे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की,महापौर मुक्ता टिळक यांना विचारले की, तुम्हाला कार्यक्रमामध्ये मिळालेल्या भेट वस्तू काय करता असे विचारले तर त्या म्हणाल्या की,त्या भेट वस्तू ठेवण्यासाठी माझ्याकडे जागा नाही असे त्यानी सांगितले.राज्य घटना ही देशाचा आत्मा आहे. ती दिशा दाखवण्याचे काम होते म्हणून यापुढे कार्यक्रमामध्ये असे विचार असलेली पुस्तके आणि आदर्श व्यक्तीची पुस्तके लोकांना भेटू वस्तू स्वरूपात देण्याची गरज आहे.

यावेळी जेष्ठ कामगार नेते बाबा आढाव म्हणाले की, शरद पवार यांचा सन्मान महात्मा फुले यांचा पागोटे घालून सन्मान केला. तर सावित्रीबाई फुले यांचे स्मृती चिन्ह भेट दिले.पवार यांनी पागोटे दिले.त्यावरून बरीच चर्चा झाली.मात्र कोणी जर या पागोट्याला जातीचे प्रतीक मानत असतील.तर ती माणसे मनाने कोत्या मनाची आहेत.पागोट्या मागाच विचार महत्वाचा आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत