पुणे: कोंढव्याजवळ चार वाहनांचा विचित्र अपघात

पुणे : रायगड माझा वृत्त 

कोंढवा-कात्रज रस्त्यावर खडीमशीन चौकाजवळ 4 ते 5 गाड्यांचा विचित्र अपघात झाला. टिळेकरनगरजवळ लोखंडी प्लेटा भरलेला ट्रेलरने धडक दिल्याने चार गाड्या एकमेकांना धडकल्या. यात डस्टर गाडी व्हिंटो कारवर आदळली. होंडा सिटी गाडीची व्हिंटो गाडीला मागून धडक बसल्याने चारही गाडांचे मोठे नुकसान झाले.

सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. पण येथील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी महानगरपालिका रस्ता कधी रूंद करणार असा प्रश्न आता स्थानिक नागरिक विचारू लागले आहेत. नेहमीच कात्रज कोंढवा रस्ता हा वाहतूक कोंडीनी जाम होत असतो.

आज सकाळी साडेअकराच्या सुमारास कात्रजकडून मंतरवाडीकडे जाणारा ट्रेलर (क्र. एम एच 46–एच1042) याने प्रथम इनोव्हा गाडीला धडक दिली. धडक एवढी जोरात होती की चार गाड्या एकमेकांना धडकल्या. त्यात डस्टर गाडी व्हिंटो गाडीवर आदळली. त्यामुळे कात्रज कोंढवा रस्त्यावरील वाहतूक एक तास विस्कळीत झाली होती. कोंढवा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक चेतन मोरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन क्रेनने वाहने बाजूला केली. त्यानंतर वाहतूक सूरळीत झाली.

 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत