पुणे : गोळी लागल्याने भाजप नगरसेवक जखमी, उपचार सुरू

पुणे : रायगड माझा वृत्त

गुरुवारी दुपारी भाजपचे स्वीकृत नगरसेवक गणेश बिडकर यांना गोळी लागल्याने खळबळ उडाली. सुरुवातीला त्यांच्यावर गोळीबार झाल्याची अफवा पसरली. परंतु काही वेळाने स्वत:चे पिस्तुल साफ करत असताना चुकून गोळी सुटल्याने ते जखमी झाल्याची माहिती जवळच्या लोकांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी भाजपचे स्वीकृत नगरसेवक गणेश बिडकर पिस्तुल साफ करत होते. याच दरम्यान चुकून पिस्तुलमधून चुकून गोळी सुटली आणि गोळी थेट मांडीत घुसली. यामुळे ते जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल केले आहे.

दरम्यान, ही घटना घरात किंवा कार्यालयात घडलेली नाही. घटनास्थळ कोणते हे स्पष्ट झालेले नाही. पोलीस पुढील तपास करत आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत