पुणे : पोलिसांनी सुरू केली एक अभिनव कल्पना

पुणे : रायगड माझा वृत्त 

वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातील आनंददायी दिवस असतो . या दिवसाचे महत्व अधिक अधोरेखित व्हावे आणि जीवनाचे मोल समजावे यासाठी पुणे येथील दत्त नगर पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांच्या पुढाकाराने  एक अनोखा उपक्रम प्रत्यक्षात येत आहे. या पोलीस ठाण्यातील प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याच्या वाढदिवशी त्याला एक हेल्मेट भेट देण्यात येते. नुकत्याच झालेल्या वाढ दिवसाच्या कार्यक्रमात पुष्पगुच्छ देण्याचे टाळून त्यांनी अमरनाथ लोणकर आणि सागर सुतकर ह्या कर्मचाऱ्यांना  हेल्मेट आणि स्वामी रामकृष्ण परमहंस यांच्या विचारांचे पुस्तक भेट म्हणून भेट दिले आहे.

पुण्यात सध्या हेल्मेट सक्ती याविषयी सर्वत्र चर्चेत आहे. या विषयावरून अनेक आंदोलने  होत आहेत. निर्माण होणाऱ्या पराभूत सुविधा आणि त्यामुळे वाहनांचा वाढणारा वेग अपघातास निमंत्रण देत आहे . हेल्मेट अभावी अनेक जण आपल्या प्राणास  मुक्त आहेत. त्यामुळे पुण्यात हेल्मेट सक्ती ची प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. या महत्वाच्या विषयावर आपल्यापासून सुरवात व्हावी आणि आपले पोलिसकर्मचारी देखील सुरक्षित राहावेत या भावनेतून पुणे येथील दत्त नगर पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांनी हा अनोखा उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमाअंतर्गत पोलीस ठाण्यातील प्रत्येक कर्मचाऱ्याचा वाढदिवस साजरा करताना त्यांना हेलमेट आणि रामकृष्ण परमहंस यांचे पुस्तक भेटीदाखल  देण्यात येते. दत्त नगर पोलीस ठाणे आपल्या विविध उपक्रमासाठी प्रसिद्ध असून दत्त नगर पोलीस ठाण्याच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत