पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर बस उलटून दोन जण जागीच ठार; तर चार जण जखमी

बेळगाव: रायगड माझा वृत्त 

पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर बडेकोळमठ इथं बस उलटून दोन जण जागीच ठार झाले, तर चार जण जखमी झाले आहेत. आज सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

णे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर बस उलटून दोन जण जागीच ठार; तर चार जण जखमी

अपघातग्रस्त बस बेळगावहून हुबळीच्या दिशेनं निघाली होती. त्यात १८ प्रवासी होते. उतारावरून जात असताना बसमध्ये तांत्रिक बिघाड झाला. बसचा ब्रेकच लागत नव्हता. त्यामुळं ड्रायव्हरनं बस बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी दुभाजकाला आदळून ही बस उलटली. त्यात दोघे जागीच ठार झाले. मृतांमध्ये बसचालक अशोक धुंडी (५०) यांच्यासह एका वृद्ध प्रवाशाचा समावेश आहे. अपघाताचं वृत्त कळताच हिरेबागेवाडी पोलिसांनी तिथं धाव घेतली. थोड्याच वेळात येथील वाहतूक सुरळीत करण्यात आली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत