पुणे: मुंढवामध्ये बिबट्याचा ४-५ जणांवर हल्ला

पुणे: रायगड माझा वृत्त

पुण्यातील मुंढवामधील केशवनगर परिसरात आज सकाळी बिबट्या घुसला असून, चार ते पाच जणांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. वनविभागाचे पथक घटनास्थळी रवाना झालं आहे. केशवनगरातील रेणुका माता मंदिरामागे बिबट्यानं चार ते पाच जणांवर हल्ला केला आहे. बिबट्याला तावडीतून एका मुलाला सोडवताना तिघे जण जखमी झाले आहेत. यामुळं परिसरात खळबळ माजली आहे. रहिवाशांवर हल्ला केल्यानंतर बिबट्या बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या खड्ड्यामध्ये पडल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेला मुंढवा पोलिसांनी दुजोरा दिला आहे. वनविभागाचे पथक घटनास्थळी रवाना झाले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत