पुणे – मुंबई एक्सप्रेस वेवर खोपोलीजवळ सहा वाहनांचा विचित्र अपघात

रायगड माझा वृत्त : खोपोली 

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर खोपोलीजवळ आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास सहा वाहनांचा विचित्र अपघात झाला. भरधाव वेगातील कंटेनरने ट्रकला धडक दिल्यानंतर पाठीमागून येणा-या चार कार कंटेनरवर जाऊन आदळल्या. पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या लेनवरील बोरघाट आडोशी खोपोली हद्दीच्या उतारावर सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात जिवितहानी झाली नाही.

आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पुण्याहून मुंबईकडे जाणा-या मार्गावर हा विचित्र अपघात झाला. पुण्याहून मुंबईकडे जाणा-या भरधाव कंटेनरने खोपोलीजवळ ट्रकला पाठीमागून धडक दिली. त्यामुळे मागून येणा-या चार कारमध्ये धडक झाली. यामध्ये ट्रकचालक जखमी झाला असून इतर सर्व सुखरुप आहेत. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. अपघातामुळे काही काळ द्रूतगती मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. परंतू अपघातग्रस्त वाहने तात्काळ बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत