पुणे-मुंबई मार्गावरील 18 फेऱ्या रद्द

पुणे : रायगड माझा

सर्वदूर सुरू असलेल्या पावसाचा एसटी वाहतुकीवर काही अंशी परिणाम झाला आहे. सोमवारी एसटीचे वेळापत्रक विस्कळीत झाले. पुण्याहून सकाळी वेळेत सुटलेल्या बसेस पावसामुळे परतीच्या प्रवास करुन परत वेळेत दाखल होत नव्हत्या. यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या अनेक बसेस नियोजित वेळेपेक्षा तास-दीड तासाने उशिरा धावत होत्या. वाहतूक कोंडी, पाऊस यामुळे बसेसला उशीर होत असल्याने पुणे-मुंबई मार्गावरील काही फेऱ्या रद्द कराव्या लागल्या.

सोमवारी पुण्यातून ठाणे, बोरिवली, दादर, कोल्हापूर, कोकण, महाबळेश्‍वरसह अन्य काही भागात ये-जा करणाऱ्या बहुतांश एसटी बसेस उशिराने धावत होत्या. तर काही बसेस वाहतूक कोंडीत अडकल्याने शिवाजीनगर स्थानकातून मुंबईकडे जाणाऱ्या 10 फेऱ्या रद्द करण्यात आल्या. तर स्वारगेट बसस्थानकातूनही मुंबईला जाणाऱ्या सुमारे 7 ते 8 फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. पुण्यातील स्वारगेट, शिवाजीनगर व पुणे स्टेशन बसस्थानकातून सकाळी वेळापत्रकानुसार बस सोडण्यात आल्या. मात्र, मुंबईत मुसळधार पाऊस सुरु असल्याने त्याठिकाणी बसेस पोहचण्यासाठी उशीर होत असे. यामुळे परतीच्या प्रवासात त्याच बसेस पुन्हा पुण्यात पोहचण्यसाठी तब्बल दीड ते दोन तासांचा उशीर झाल्याचे दिसून आले.

रेल्वे वाहतुकीवर परिणाम नाही.

मुंबईमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा सोमवारी रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला नाही. गेल्या काही दिवसापासून पावसामुळे रेल्वे रद्द केल्या जात होत्या. मात्र, सोमवारी एकही रेल्वे रद्द केली नसल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले. दरम्यान, रेल्वे रद्द करण्यात आली नसली, तरी काही प्रमाणात स्थानकात पोहचण्यास उशीर होत असल्याचे प्रवाशांनी सांगितले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत