पुणे येथे टेकडीवर फिरायला गेलेल्या युवक,युवतीला चाकूचा धाक दाखवून लुबाडले

पुणे : रायगड माझा वृत्त 

हनुमान टेकडी परिसरात फिरायला गेलेल्या महाविद्यालयीन युवक आणि युवतीला धमकावून त्यांच्याकडील दागिने आणि २ मोबाईल असा २८ हजार ५०० रुपयांचा ऐवज लुटून नेल्याची शनिवारी दुपारी घडली. चोरट्यांनी महाविद्याालयीन युवतीला लुटल्याची घटना उघडकीस आल्यानंतर डेक्कन तसेच चतु:शृंगी पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे.
याबाबत  १८ वर्षाच्या महाविद्याालयीन युवतीने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाविद्यालयीन युवती आणि तिचा मित्र शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास हनुमान टेकडी भागात फिरायला गेले होते. त्या वेळी दोन चोरट्यांनी त्यांना अडवले आणि धमकावण्यास सुरुवात केली. चोरट्यांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. युवतीकडील सोन्याच्या रिंगा आणि मोबाईल तसेच तिच्या मित्राकडील मोबाईल असा २८ हजार ५०० रुपयांचा ऐवज जबरदस्तीने काढून घेतला़ त्यानंतर चोरटे टेकडीवरून पसार झाले. घाबरलेल्या युवक आणि युवतीने थेट घरी गेले़ डेक्कन पोलिसांकडे रविवारी दुपारी त्यांनी येऊन आपल्यावर घडलेल्या प्रसंगाची माहिती पोलिसांना दिली.
यापूर्वी हनुमान टेकडीवर फिरायला येणाऱ्या युगलांना धाक दाखवून लुबाडण्याच्या घटना जानेवारी तसेच फेब्रुवारी २०१६ मध्ये घडल्या होत्या़. त्यातील चोरट्यांना पोलिसांनी अटक केली होती़ त्यानंतर आता पुन्हा हनुमान टेकडीवर दुपारी फिरायला गेलेल्या युवक-युवतींना लुबाडण्याची घटना घडली आहे़. डेक्कन पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राहुल कोलंबीकर अधिक तपास करीत आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत