पुणे-लोणावळा मार्गावर आजपासून एकेरी ब्लॉक

पुणे : रायगड माझा वृत्त

पुणे ते लोणावळा रेल्वे स्थानकादरम्यान १० ते ३० सप्टेंबर या कालावधित दररोज तीन तास एकेरी ब्लॉक घेण्यात येणार आहे. रुळाची देखभाल-दुरुस्ती आणि सिग्नल प्रणालीत सुधार करण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे-लोणावळा (१२ः१५ वा.), पुणे-लोणावळा (१ः००), लोणावळा-पुणे (२ः००) आणि लोणावळा-पुणे (३ः४०) या लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत