पुणे सातारा रस्त्यावर ट्रक आणि तीन दुचाकींमध्ये भीषण अपघात; तीन तरुणांचा मृत्यू तर पाच तरुण जखमी

पुणे सातारा रस्त्यावर भीषण अपघात, तीन तरुणांचा मृत्यू तर पाच तरुण जखमी

पुणे : रायगड माझा वृत्त

सोमवारी रात्री पुणे सातारा रस्त्यावर कोंढणपुरजवळ ट्रक आणि तीन दुचाकींची धडक झाल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात पुण्यातील तीन तरुणांचा मृत्यू झालायं तर पाच तरुण जखमी झाले आहेत. या अपघातील सगळे तरुण पुण्यातील तळजाई टेकडी परिसरात राहणारे आहेत.

सोमवारी रात्री पार्टी केल्यानंतर हे तरुण रात्री डे बारा वाजता कोंढणपुर जवळ असलेल्या दर्ग्याचे दर्शन घेण्यासाठी निघाले. मात्र कोंढणपुरजवळ या तीनही दुचाकी ट्रकला धडकल्या. यातील जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत