पुणे: साहित्यिक श्रीधर माडगूळकर यांचे निधन

पुणे: रायगड माझा वृत्त

ग्रेसचे जुने कार्यकर्ते, साहित्यिक श्रीधर माडगूळकर यांचे आज निधन झाले. गीतकार ग. दि. माडगूळकर यांचे ते सुपुत्र होते. साहित्य, कला, क्रीडा, राजकारण अशा सर्वच क्षेत्रांत त्यांचा सहभाग होता. एवढेच नाही तर शैक्षणिक क्षेत्रात देखील त्यांनी आपला ठसा उमटवला आहे.

सांगली जिल्ह्यातील माडगूळे या खेड्यात गजानन विकास प्रतिष्ठान या संस्थेची स्थापना करुन त्यांनी कै. ग. दि. माडगूळकर हायस्कूल सुरू केले. आठ एकर जागेत ही शाळा असून, त्यात सुमारे ५०० विद्यार्थी शिकत आहेत. १९७५मध्ये त्यांनी काँग्रेसचे सदस्यत्व स्वीकारले. १९८० व १९८५ साली विधानसभा निवडणुकांत त्यांचा सक्रिया सहभाग होता.

त्याचे साहित्यातील योगदान

१९९७ साली इंटरनेटवर मराठी भाषेतील ‘जाळं’ या पहिल्या साप्ताहिकाची सुरवात करुन याचे यशस्वी संपादन केले. गदिमा.कॉम या मराठीतील सर्वात मोठ्या साहित्यिक वेबसाइटच्या रचनेत सल्लागार म्हणून मोलाची कामगिरी बजावत होते. मराठीसृष्टी.कॉम या साहित्यिक वेबसाइटच्या सल्लागार मंडळाचे सदस्य होते.

युवक चळवळीत त्यांचा सहभाग
महाविद्यालयीन जीवनापासूनच विद्यार्थ्यांच्या विविध चळवळीत सहभाग घेतला. १९७८ साली पुणे शहर युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी व शहर काँग्रेसच्या सरचिटणीसपदी निवड झाली. या काळात झोपडपट्टी सुधारणा, आपद्ग्रस्तांना मदत, रक्तदान, वनसंवर्धन इत्यादी कार्यक्रम घेऊन अनेकांना स्वयंरोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न केला.

कामगारांसाठी उललेखनीय काम
– मॅफकोच्या कामावरुन अन्यायाने काढून टाकलेल्या ५४ कामगारांना पुन्हा सन्मानाने कामावर घ्यायला लावले.
– पुणे पीएमटी कामगारांना संघटित करून पुणे म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँकेतील भ्रष्टाचार उघडकीस आणून तेथील भ्रष्ट संचालक मंडळ बरखास्त करण्यास सरकारला भाग पाडले.
– महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तक मंडळात इंटक युनियन स्थापण्यात पुढाकार घेतला.
– १९८१/८२ साली महाराष्ट्राचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान करणारा एमएसईबीतील सबॉर्डीनेट इंजिनिअर्सचा संप मिटवण्यात यशस्वी मध्यस्थी
– सदगुरु जंगली महाराज ऑटोरिक्षा संघटनेच्या स्थापनेत पुढाकार घेऊन रिक्षा चालकांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला
-‘महाराष्ट्र कामगार साहित्य परीषदेच्या’ कामकाजात मोलाचा सहभाग.
-कामगार कल्याण मंडळावर सभासद असताना सांगली जिल्ह्यातील माडगूळ या छोट्याश्या खेड्यात ग्रामीण भागातील पहिले कामगार कल्याण केंद्र सुरु केले.

सरकारी संस्थांमधील सहभाग

  • संजय गांधी निराधार योजना (अध्यक्ष,शिवाजीनगर मतदार संघ) (५ वर्ष)
  • सेन्सॉर मंडळ, मुंबई
  • आय.टी.आय निवड समिती. (दोन वेळा)
  • महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ. (दोन वेळा)
  • फिल्म अॅडव्हायझरी कमिटी.
  • ऑल इंडिया रेडिओ,पुणे,सल्लागार समिती.
  • पुणे दुग्धविकास प्रकल्प सल्लागार समिती.
  • गदिमा स्मारक समिती.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत