पुणे होर्डिंग प्रकरणी रेल्वेच्या दोघांना अटक

रायगड माझा वृत्त । पुणे

 

पुण्यात होर्डींग कोसळून झालेल्या अपघाताप्रकरणी पोलिसांनी मध्य रेल्वेच्या दोन कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. संजय सिंह, पांडुरंग वनारे अशी त्या दोघांची नावे आहेत. या दोघांवर होर्डिंगला आधार देणारे अँगल कापल्याचा आरोप आहे.

पुण्यात अजस्र होर्डिंग कोसळून चार ठार, 11 जखमी

गुरूवारी पुण्यातील जुना बाजार परिसरातील शाहीर अमर शेख चौकामध्ये जाहीरातीचा एक मोठा होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला तर अकरा जण जखमी झाले. या प्रकरणी पोलिसांनी मध्य रेल्वेमध्ये पांडुरंग वनारे आणि लोहार संजय सिंह यांना अटक केली आहे. या दुर्घटनेचा जो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओत हे दोघे होर्डिंगच्या खाली उभे राहून काहीतरी करत असल्याचे दिसत आहे. याप्रकरणाच्या चौकशीसाठी रेल्वेकडून समिती नेमली आहे.

हे सुद्धा वाचा 

आईच्या अस्थीविसर्जनानंतर परतताना पित्यालाही गमावले

आरोग्यसेविकेच्या विनयभंगप्रकरण; अखेर त्या शिक्षकाचे २५ दिवसानंतर निलंबन

 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत