पुण्यातील मुठा कालवा फुटला; दांडेकर पूल पाण्याखाली

पुणे : रायगड माझा वृत्त 

पुण्यात आज सकाळी ११ च्या सुमारास सिंहगड रस्त्यावर मुठा उजवा कालवा अचानक फुटला. यानंतर दांडेकर पूल परिसरातील रस्त्याला नदीचे स्वरुप आले आहे. आजूबाजूच्या परिसरात असलेल्या इमारतींमध्ये पाणी घुसले असून अनेकजण अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे. अजूनही उच्चपदस्थ पाठबंधारे विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झालेले नाहीत.यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. अनेकदा तक्रारी करूनही पीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.स्थानिक नागरिकांनी तक्रारी करुनही अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे ही दुर्घटना घडली आहे.

 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत