पुण्यात अनैतिक संबंधातून प्रियकराकडून प्रेयसीची हत्या, माळरानात पेट्रोल टाकून जाळला मृतदेह

पुणे : रायगड माझा

अनैतिक संबंधातून प्रियकराने 25 वर्षीय प्रेयसीची निर्घृण हत्याकडून तिचा मृतदेह पेट्रोल टाकून जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लोहगाव येथे ही घटना शुक्रवारी (ता. 11) घडली. तरुणीचा मृतदेह 80 टक्के जळाला आहे. तरुणीच्या हातावर अयोध्या हे नाव गोंदले होते. या नावाने फेसबुकवरून तरुणीची ओळख पटवण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.

सूत्रांनुसार, लोहगाव येथील पाटील वस्ती शेजारील माळरानात महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळला. महिलेल्या उजव्या हातावर इंग्रजीत A.B व Aayodya (अयोध्या) असे गोंदले होते. याप्रकरणी लोहगाव विमानतळ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर महिला 80 टक्के जळाल्याने तिची ओळख पटवणे अवघड होते.

तांत्रिक माध्यम आणि सोशल मीडियाच्या माध्यमांचा आधार घेऊन पोलिसांना महिलेची ओळख पटविण्यात यश मिळाले. हातावरील गोंदणावरून बातमीदारांमार्फत व तिला ओळखणार्‍या व्यक्तीचा शोध घेऊन जवळच्या मैत्रिणीचा शोध घेण्यात आला.

अयोध्या सुदाम वैद ( वय-25, धंदा- खासगी नोकरी, रा. शिवशंकर कॉलनी, गल्ली क्र.3, बेडसे चाळ, चक्रपाणी वसाहत, भोसरी पुणे) मृत महिलेचे नाव आहे. तिचा प्रियकर बालाजी धाकतोडे (रा. मुंजोबा वस्ती, धानोरी रोड पुणे) हा 10 मे रोजी अयोध्याला भेटण्यासाठी गेली होती. परंतु ती घरी आली नसल्याचे समजले. तसेच तिचा प्रियकर देखील त्या दिवसापासून बेपत्ता आहे. पोलिस त्याच शोध घेत आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत