पुण्यात चार वर्षाच्या मुलीवर कवटी प्रत्यारोपण, भारतातील पहिलाच प्रयोग

पुणे : रायगड माझा वृत्त 

मेंदूचा सुरक्षितपणे सांभाळ करणाऱ्या कवटीचे प्रत्यारोपण करण्याची किमया पुण्यातील डॉक्टरांनी साधली आहे.  चार वर्षांच्या चिमुकलीच्या मेंदुची निकामी झालेली कवटी बदलून डॉक्टरांनी तिची मृत्यूच्या दाढेतून सुटका केली आहे. भारतातील ही पहिली कवटी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आहे. मुलगी कुटुंबियासोबत कोथरूडमध्ये राहते. तिचे वडिल शाळेची बस चालवतात.

३१ मार्च २०१७ रोजी शिरवाळ येथे एका चारचाकी वाहनानं धडक दिली होती. या अपघातामध्ये मुलीच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. यामध्ये तिच्या मेंदुच्या आजुबाजूची ६० टक्के कवटी पूर्णपणे निकामी झाली होती. तिच्या कवटीतील हाडांना अनेक जखमा झाल्या होत्या. तिला रुग्णालयात नेईपर्यंत डोक्यातून भरपूर रक्त वाहून गेलं होतं. ती जगेल की नाही याचीही डॉक्टरांना शंका होती. त्यावेळी या लहान मुलीवर सर्जरी करण्यात आली होती. डॉक्टरांनी त्या लहानगीला पुन्हा एकदा रूग्णालयात बोलवले होते. चार डॉक्टरांनी या लहानगीच्या कवटीवर यशस्वी प्रत्यारोपण करत तिची मृत्यूच्या दाढेतून सुटका केली आहे.

या मुलीवर उपचार करणारे भारती हॉस्पिटलमधील डॉक्टर जितेंद्र ओसवाल यांनी मोठे यश मिळाल्याची प्रतिक्रिया दिली. ही भारतातील पिहलीच प्रात्यारोपण शस्त्रक्रिया असल्याचे म्हटले आहे. लहान मुलीच्या डोक्याला झालेल्या दुखापत गंभीर आणि खोलवर जखम झाली होती. जखम भरूनही कवडी ६० टक्के निकामी झाली होती. बेशुद्ध अवस्थेत तिला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी तिच्या डोक्यातून रक्त वाहत होते. तिला तात्काळ व्हेंटिलेटरवर ठेवावे लागले. त्यानंतर सिटी स्कॅन करण्यात आले. कवटीचा मागील हिस्सा निकामी झाल्याचे सिटी स्कॅनमधून समोर आले. त्यानंतर तिच्यावर उपचार सुरू करण्यात आल्याची प्रतिक्रिया भारती हॉस्पिटलमधील डॉक्टर जितेंद्र यांनी दिली.

दीड वर्षापूर्वी कठीण सर्जरी केल्यानंतर तिला घरी पाठवले होते. तिच्या डोक्याच्या वेगळ्या आकारामुळे सर्वसामान्य मुलींमध्ये ती मिसळत नव्हती. तिच्या कवटीचे प्रत्यारोपण करण्यासाठी तिला पुन्हा रूग्णालयात बोलवण्यात आले. डॉक्टरांनी मुलाला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. प्रात्यारोपण करताना मुलीच्या मेंदुला धक्का पोहचणार नाही याची काळजी घेतली. न्यूरोसर्जन्सनी तिच्या मेंदूजवळची निकामी हाडं अलगदपणे काढून टाकली. ही हाडं काढताना तिला कुठेही जखम होऊ दिली नाही. पण डोक्यासाठी नवीन कवटी बसवणं गरजेचं होतं. त्यामुळे अमेरिकेतून खास एक कृत्रिम कवटी मागवण्यात आली. दोन ते तीन किचकट शस्त्रक्रिया करून ही कवटी तिच्या डोक्यात बसवण्यात आली.  कित्येक तास चाललेल्या शस्त्रक्रियामध्ये कवठीच्या हाडांचे ३ डी मॉडेलला यशस्वी जोड्यात आले. सध्या मुलीचे स्वास्थ पहिल्यापेक्षा उत्तम आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत