पुण्यात दहीहंडीची वर्गणी दिली नाही म्हणून दुचाकी जाळली

पुण्यात आंबेगाव येथे दहीहंडीसाठी ५०० रुपये देणगी नाकारली

रायगड माझा ऑनलाईन | पुणे

पुण्यात दहीहंडीची वर्गणी दिली नाही म्हणून दुचाकी जाळली

पुणे, ०२ सप्टेंबर- पुण्यात आंबेगाव येथे दहीहंडीसाठी ५०० रुपये देणगी नाकारली म्हणून दत्ता विजय शिंदे, ओमकार संदीप कांबळे, दत्ता राहुल कदम आणि सुमित राजू अहिवळे यांनी प्रफुल थोरात यांची दुचाकी जाळली. मध्यरात्री १ वाजता आंबेगाव बुद्रुक येथील पृथ्वीराज अपार्टमेन्टमध्ये पार्किंगमधील दुचाकी जाळली. यासंदर्भात भारती विद्यापीठ पोलिस स्थानकात थोरात यांनी तक्रार दाखल केली असून चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, काल पुण्याच्या सिंहगड रोड भागात एक धक्कादायक घटना घडली. दहिहंडीचा बॅनर लावण्याच्या वादातून तरूणाचा खून करण्यात आला. अक्षय हडशी असं या तरुणाचं नाव आहे. दहिहंडी उत्सवासाठी जागोजागी बॅनर लावले जातात पण आता हिच बॅनरबाजी अक्षयच्या जीवावर बेतली. गेल्या अनेक दिवसांपासून पिंपरी- चिंचवडमध्ये दहिहंडीच्या बॅनरवरून वाद सुरू होता. त्याचाच राग म्हणून काल रात्री १.३० वाजता मानिक बाद कॉलनी सिंहगडरोड जवळ असलेल्या पेट्रोल पंपाजवळ काही तरूणांनी अक्षयवर तलवारीने वार केले आणि तिथून पळ काढला.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अक्षयची ओळख पटवून घेत या घटनेबद्दल त्याच्या कुटुंबियांना सांगण्यात आलं. दरम्यान, पोलिसांनी तीन जणांना हत्या केल्याच्या संशयावरून ताब्यात घेतलं. अक्षयचा खून नेमका का केला, त्याला मारण्यामागे किती जणांचा हात आहे, या सगळ्याचा पोलीस तपास घेत आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.