पुण्यात भरधाव कार टेम्पोवर आदळून २ ठार

पुणे : रायगड माझा वृत्त 

ब्रेमेन चौकाकडून पुणे विद्यापीठाकडे जाणारी भरधाव कार दुभाजक ओलांडून समोरून येणाऱ्या टेम्पोवर आदळली. या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू, तर दोघे जखमी झाले. गुरुवारी मध्यरात्री ही घटना घडली.

प्रतीक शेट्टीवार (वय २९), राहुल नायर (वय २८) अशी मृतांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, राहुल आणि प्रतीक हे मूळचे केरळचे असून, ते आणि इतर दोघे कारमधून ब्रेमेन चौकाकडून पुणे विद्यापीठाच्या दिशेने जात होते. चालकाचे भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्यानं कार दुभाजकावरून विरुद्ध दिशेने समोरून येणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरवर आदळली. त्यानंतर इतर दोन वाहनांनाही धडकली. या भीषण आणि विचित्र अपघातात कारमधील चौघे गंभीर जखमी झाले. त्यातील दोघांचा मृत्यू झाला. तर दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताची माहिती मिळताच, चतुःश्रुंगी पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत