पुण्यात मोलकरणीनेच केला विश्वासघात

पुणे: रायगड माझा वृत्त

सिंहगड रस्त्यावरील सरिता वैभव बिल्डींगमध्ये राहणाऱ्या एका कुटुंबाने महिलेला मोलकरणीचे काम सोपवले.परंतु या कुटुंबाला मोलकरीण महिलेने दणका देत घरातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम अशा ऐवजाची चोरी केली. मंगळवारी (दि.४ ) कपाटामधील कपडे व इतर वस्तु यांची आवरा आवर करत असताना सोन्याचे दागिने,रोख रक्कम,परदेशी नाणी, असा काही ऐवज दिसला नाही. याप्रकरणी मोलकरणीला पोलिसांनी ताब्यात घेवून तिच्याकडे चौकशी केली. या चौकशीत तिने चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली. मनीषा पांडुरंग देबे (रा. जनता वसाहत पुणे)असे मोलकरीण महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि.४ ) कपाटामधील कपडे व इतर वस्तु यांची आवरा आवर करत असताना सोन्याचे दागिने,रोख रक्कम,परदेशी नाणी, असा काही ऐवज दिसला नाही. संपुर्ण घरामध्ये शोधाशोध केल्यावरही वस्तू सापडल्या नाहीत. मोलकरीण महिलेने नीलकंठ व प्राजक्ता साठे यांच्या घरातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम अशा ऐवजाची चोरी केली. पोलिसांनी देबे यांच्याकडे चौकशी केल्यानंतर या चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली. तपास पथकातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी तपासाची चक्रे अत्यंत वायुवेगाने फिरवत देबे हिने चोरलेले सव्वा लाखांचे सोन्याचे दागिने ,जुनी भारतीय व परदेशी करन्सीचे नाणी एक रिस्ट वॉच असा चोरलेला सर्व ऐवज तिच्या कडुन हस्तगत केला. अशा प्रकारे दत्तवाडी पोलीसांनी ४८ तासांमध्ये चोरीस गेलेला सर्व ऐवज व चोरणारी महिला मनीषा देबे हिला अटक करुन तिच्याकडे झाल्या चोरीचा तपास पुर्ण करुन तिच्याविरुद्ध शिवाजीनगर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. या गुन्ह्याचा संपुर्ण तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे, पोनि (गुन्हे ) के.व्हि . इंदलकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल डफळ पोलीस उपनिरीक्षक तपास पथक यांनी केला असून पोलीस हवालदार तानाजी निकम , पो.ना. महेश गाढवे, राहुल ओलेकर, पोलीस शिपाई शरद राऊत व महिला पोलीस शिपाई सुप्रिया राऊत यांनी तपासामध्ये सहकार्य केले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत