पुण्यात वॉल पेटिंगच्या माध्यमातून सरकारचा निषेध

पुणे : रायगड माझा वृत्त 

पुणे येथील फर्ग्युसन कॉलेजच्या भिंतीवर “चौकीदार चोर है”, असे वॉल पेटिंगच्या माध्यमातून लिहून सरकारने ४ वर्ष पूर्ण होवून ही नोकऱ्या नाहीत म्हणून महाराष्ट्र प्रदेश एनएसयू आणि पुणे जिल्हा एनएसयू तर्फे सरकारचा निषेध व्यक्त  केला.

यामध्ये फसव्या घोषणा करत दर वर्षी २ कोटी नोकऱ्या देऊ असे आश्वासन देऊन युवकांची आणि विद्यार्थ्यांची मते घेतली. परंतू नोकऱ्या द्यायच्या लांब, जे विद्यार्थी चांगले काम करत होते त्यांच्या सुद्धा नोकऱ्या बोगस कार्यप्रणाली मुळे हिसकावून घेतल्या. शिक्षण निधी बंद केला. या विरोधात राज्यातील भाजप सरकारला सत्तेत येऊन ४ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त,सरकारच्या निषेधात महाराष्ट्र प्रदेश एनएसयू आणि पुणे जिल्हा एनएसयूतर्फे फर्ग्युसन कॉलेजच्या भिंतीवर “चौकीदार चोर है”, असे फर्ग्युसन कॉलेजच्या भिंतीवर वॉल पेटिंग काढून सरकारचा निषेध केला.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत