पुण्यात २ अल्पवयीन मुलींवर बलात्कार, एकीचा मृत्यू

रायगड माझा वृत्त 

पुण्याच्या हिंजवडी परिसरात १२ वर्षीय दोन मुलींवर बलात्कारझाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यातील एका मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील हिंजवडी पोलीस ठाणाच्या हद्दीत रविवारी हा माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार घडल्याचं समजतं. पीडित मुलीच्या आईने हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी याप्रकरणी आरोपी गणेश निकम याला या प्रकरणी अटक केली आहे. तर त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतलं आहे.

पोलिस उपायुक्त नम्रता पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘बारा वर्षे वयाच्या दोन मुली रविवारी दुपारी एका मंदिरात दर्शनाला गेल्या होत्या. मंदिराजवळ गेल्यानंतर त्या ठिकाणी गणेश आणि त्याचा मित्र उभे होते. या दोघांनी या दोन अल्पवयीन मुलींना चॉकलेटचे आमिष दाखवून मंदिरामागील झुडुपात नेले. यातील एका मुलीवर दोघांनी आळीपाळीने लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर दुसऱ्या मुलीवर एकाने बलात्कार केला. यानंतर या दोन्ही मुलींना धमकाविण्यात आले. ‘या प्रकाराबाबत कोणाला सांगायचे नाही, सांगितले, तर बघ,’ अशी धमकी दिली गेली. यामुळे पीडित मुली अत्याचार होऊनही शांत होत्या. दरम्यान, बुधवारी यातील एका पीडित मुलीची प्रकृती बिघडल्याने तिला पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. दुसऱ्या मुलीलादेखील त्रास होऊ लागल्याने तिलाही हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता, तिने दोघींबाबत घडलेला प्रकार आईला सांगितला.’

दरम्यान, हॉस्पिटलमध्ये प्रथम दाखल करण्यात आलेल्या मुलीची प्रकृती खालावली असून, ती कोमामध्ये गेल्याचे समजते. ही घटना उघड होताच पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अतिरिक्त आयुक्त मकरंद रानडे, उपायुक्त पाटील, सहायक आयुक्त श्रीधर जाधव आदींसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. हिंजवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शिवाजी गवारे तपास करीत आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत