पुण्याहून मुंबईला जाणारा मालवाहू ट्रक पुलावरून कोसळला

पुणे : रायगड माझा वृत्त 

पुण्याहून मुंबईला जाणारा मालवाहू ट्रक पवना नदीच्या पुलावरून कोसळला. आज सकाळी ६.३० च्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात ड्रायव्हर आणि क्लिनर दोघेही गंभीर जखमी झाले. कात्रज देहूरोड बायपासजवळच्या रावेत गावाजवळ ट्रक आला. त्यावेळी एका खासगी बसने ट्रकला हुलकावणी दिली. त्यानंतर ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक पुलाचा कठडा तोडून ४० फूट खाली पडला. या अपघातात ड्रायव्हर आणि क्लिनरचा अपघात झाला. या दोघांनाही खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. देहूरोड पोलीस आणि हिंजवडी पोलीस या प्रकरणी पुढील चौकशी करत आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत