पुण्‍यात सिंहगड रोडवरील सेक्‍स रॅकेटचा पर्दाफाश, 3 महिलांची सुटका

रायगड माझा वृत्त 

पुणे- सिंहगड रोडवरील नवले ब्रीजजवळ असणा-या स्‍वागत लॉजमध्‍ये वेश्‍या व्‍यवसाय चालत असल्‍याचा धक्‍कादायक प्रकार आज (मंगळवारी) उघडकीस आला. सामाजिक सुरक्षा विभागाने येथे छापा टाकून येथील सेक्‍स रॅकेटचा पर्दाफाश केला.

लॉजमधून 3 महिलांची सुटका करण्‍यात आली तर महिलांना वेश्‍या व्‍यवसायाला लावणा-या दोघांना अटक करण्‍यात आली आहे. मयंककुमार भगवान पांडे (वय २४, रा. जि रोहतास, बिहार) आणि शुभम तुफानी सिंह (वय ३८, रा. मांगडेवाडी, सातारा रोड, कात्रज) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत़.याबाबत पोलिसांनी सांगितले की, मयंककुमार पांउे आणि शुभम सिंह हे दोघेही लॉजमधील कामगार आहे. आर्थिकदृष्‍ट्या अडचणीत असलेल्‍या महिलांना हेरून हे दोघे अशा महिलांना पैशांचे आमिष दाखवत त्‍यांना वैश्‍या व्‍यवसाय करण्‍यास भाग पाडायचे. बहुतांश महिला या मोलमजुरी करणा-या असत. त्‍यांना लॉजवर ठेवून दोघेजण त्‍यांच्‍यांकडे ग्राहक पाठवत. अटक करण्‍यात आलेल्‍या तिन्‍ही महिला घरोघरी मोलमजुरीचे काम करतात. याप्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक संगिता यादव करीत आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.