पुना हॉस्पिटलमधील डॉक्टरची आत्महत्या

पुणे : रायगड माझा वृत्त 

पुना हॉस्पिटलमधील प्रसिद्ध डॉक्टर शशिकांत बंब यांनी आज सकाळी हॉस्पिटलमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचं सांगितलं जात असलं तरी त्यांच्याकडे सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये आत्महत्येस कुणालाही जबाबदार धरू नये, असं म्हटलं आहे. दरम्यान, बंब यांच्या आत्महत्येमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

डॉ. शशिकांत बंब हे पुना हॉस्पिटलमध्ये दंत चिकित्सक होते. आज सकाळी ७.३० वाजता ते नेहमीप्रमाणे हॉस्पिटलमध्ये आले. त्यानंतर ते डॉक्टरांच्या विश्रांती कक्षात गेले. येताना त्यांनी घरून दोरी आणली होती. या विश्रांती कक्षातच त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करण्यास सुरुवात केली असता बंब यांच्या खिशात सुसाइड नोट सापडली. त्यात त्यांनी कुणालाही दोषी धरलेलं नाही.

दरम्यान, नैराश्यामुळे बंब यांनी पाऊल उचल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत