पुरंदर एअरपोर्टसाठी भू संपादनाचे मॉडेल तयार- मुख्यमंत्री

रायगड माझा वृत्त 

पुणे जिल्ह्यात पीएमआरडीए हद्दीत पुरंदरचा विकास झपाट्याने होतो आहे. पुरंदर एअरपोर्टसाठी भू संपादनाचे मॉडेल तयार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. एवढेच नाही तर काही दिवसातच पुरंदर एअरपोर्टसाठी भू संपादनाची प्रक्रिया सुरु होईल असेही त्यांनी सांगितले. पुणे जिल्ह्यातील महाळुंगे माण हाय – टेक सिटी नगररचना योजना क्र १ या प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट,समाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, पीएमआरडीचे आयुक्त किरण गीते, आमदार मेधा कुलकर्णी तसेच आदी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पुणे शहराचा रिंगरोडचा प्रश्न मागील कित्येक वर्षापासून प्रलंबित असताना, केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता येताच PMRDA ची स्थापना करण्यात आली. त्या नंतर रिंगरोडच्या कामाला वेग आला असून  हा रिंगरोड पुणे शहराच्या विकासाला आधिक गती देणारा ठरणार आहे. तसेच रिंगरोड चा पहिला टप्पा ३२ किलोमीटर चा असून त्याला देखील गती देण्याचे काम केले आहे.  तसेच ते पुढे म्हणाले की, PMRDA च्या माध्यमातून अनेक काम केले जात असून आता PMRDA ची गाडी सुसाट सुटली आहे. त्याला ब्रेक लागला तर डबल इंजिन ची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले की, केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आल्यावर मेट्रो आणि अनेक समस्या चे काय होणार असा विरोधकांनी अनेक वेळा मुद्दा उपस्थित केला आहे. मात्र भाजपाने राज्यातील आणि पुणे शहरातील अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने पुणे शहराचा मेट्रोचा प्रश्न मार्गी लावला आहे. पुण्यात लवकरच मेट्रो धावणार असून ज्यावेळी शिवाजीनगर ते हिंजवडी दरम्यान मेट्रो धावणार तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तिकीट काढून हिंजवडी ला येतील. असे म्हणताच सभागृहात हशा पिकला.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत