पुलवामा दहशतवादी हल्लाप्रकरणी ७ जण ताब्यात

श्रीनगर : रायगड माझा वृत्त 

Image result for pilwama

 

१४ फेब्रुवारी रोजी झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षादलाकडून कारवाई करण्यास सुरूवात झाली आहे. या कारवाई दरम्यान सुरक्षादलाकडून ७ जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी सतत छापेमारी सुरू आहे. सिंबू नबल येथून ६ जण तर लारू भागातून एकाला अटक करण्यात आली आहे. राष्ट्रीय शोध पथकाकडून (एनआयए) ही कारवाई करण्यात येत आहे. एनआयएची टीम आणि जम्मू-काश्मीर पोलिस एकत्रितपणे कारवाई करणार आहे. राष्ट्रीय सुरक्षा गार्डच्या (एनएनजी) विशेषज्ञांची टीमही पुलवामात घटनास्थळी दाखल झाली असून शोधकार्य सुरू आहे.

पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीर दौऱ्यावर असलेल्या गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांसह बैठक घेण्यात आली. या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे सैनिकांचा मोठा ताफा जात असताना काही वेळासाठी सामान्यांसाठी वाहतूक थांबवण्यात येईल. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जम्मू-काश्मीरमध्ये काही घटक आयएसआय आणि दहशतवादी संघटनेशी निगडीत आहेत. संपूर्ण जग दहशतवादाचा विरोध करण्यासाठी एकत्र उभे असून आपण ही दहशतवादविरोधी लढाई जिंकू असे गृहमंत्र्यांनी म्हटले आहे. भारत सरकार शहीद जवानांच्या कुटुंबियांसोबत असून सर्व राज्यातील सरकारला शहीदांच्या कुटुंबियांना मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

भारताने पाकिस्तानातील आपले उच्चायुक्त अजय बिसारिया यांना पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी नवी दिल्ली येथे बोलवण्यात आले आहे. जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामामध्ये झालेल्या दहशवादी हल्ल्यात ४४ भारतीय जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानकडून मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत