पुलवामा हल्ल्यातील 40 जवान शहीद झाले, हे जवान राजकीय बळी आहेत : राज ठाकरे

कोल्हापूर : रायगड माझा वृत्त

पुलवामा दहशतवादी हल्ला झाल्यानंतर देशभरात संताप आणि रोषाचं वातावरण आहे. मात्र पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहीद राजकीय बळी ठरत असल्याचा घणाघाती आरोप राज ठाकरे यांनी कोल्हापूरच्या एका सभेत केला आहे. राज ठाकरे सध्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. आज अंबाबाईचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी राज ठाकरे यांनी एक सभा घेतली. यामध्ये भाजप सरकारवर टीका करताना मतदारांच्या कमकुवत स्मरणशक्तीचा भाजप फायदा घेणार आहे. अजित डोवाल यांची कसून चौकशी करा म्हणजे सारं राजकारण बाहेर पडेल अशी मागणी राज ठाकरे यांनी बोलताना केली. तसेच आगामी दिवसात भारत विरुद्ध पाकिस्तान असा चित्र उभं करून मतदारांचं लक्ष मोदी सरकारच्या घोटाळ्यांवरून हटवले जाईल असा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे.तसेच पाकिस्तानात जाणारं पाणी अडवून, पाकची कोंडी करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक मंत्री आणि नेत्यांनी म्हटले असताना, या वक्तव्यांचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला . “नदीमध्ये बंधारा म्हणून अमित शाहांना बसवणार का?” अशा शब्दात राज ठाकरेंनी पाणी अडवण्याच्या निर्णयावर कणखर शब्दात निशाणा साधला. तसेच आगामी दिवसात भारत विरुद्ध पाकिस्तान असा चित्र उभं करून मतदारांचं लक्ष मोदी सरकारच्या घोटाळ्यांवरून हटवले जाईल असा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे.

नेमके काय म्हटले राज ठाकरे ?

“नदीमध्ये बंधारा म्हणून अमित शाहांना बसवणार का? अमित शाहा जारे झोप , अडेल पाणी आपोआप.”, असे म्हणत राज ठाकरे पुढे म्हणाले,”पाकिस्तानचं पाणी तोडणार. पाकिस्तानचं पाणी तोडयला, ते पाणी नळातून देता का? इंटरनॅशनल वॉटर अॅक्ट नावाची काही गोष्ट असते की नाही? दोन किंवा तीन देशातील जाणारं पाणी एक देश थांबवू शकतो का?”

तसेच, पुलवामा हल्ल्यातील 40 जवान शहीद झाले, हे जवान राजकीय बळी आहेत, असा गंभीर आरोपही राज ठाकरेंनी यावेळी केला.

“अजित डोभाल या एका माणसाची कसून चौकशी झाली ना, तर सगळ्या गोष्टी बाहेर पडतील. हे नेमकं काय प्रकरण होतं आणि काय घडलंय, हे बाहेर येईल.”, असे म्हणत पुलवामा हल्ल्यावरुन राज ठाकरेंनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

“निवडणुकीच्या तोंडावर किंवा मध्यात अशीच कोणतीतरी घटना घडवली जाईल आणि तुमच्या सगळ्यांचं लक्ष हे त्या गोष्टीकडे वळवलं जाईल. चार वर्षातील भ्रष्टाचार वगैरे तुम्ही विसरून जाल. अशी कोणतीही गोष्ट हे घडवू शकतात. आपली स्मरणशक्ती कमी असते, त्यामुळे त्या गोष्टी घालवायच्या. हिंदुस्तान विरुद्ध पाकिस्तान असे चित्र निर्माण केलं जाईल.”, असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.

राफेल घोटाळा, नोटाबंदीचा आर्थिक फटका यापासून आपलं लक्ष विचलित करण्यासाठी मोदी सरकार आता पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर खोटा शत्रू उभा करून अशा काही गोष्टी घडवून आणतील की मतदारांना जुन्या गोष्टींचा विसर पडेल. योग्य वेळ आली की मतदानाच्या प्रचारसभेत या बाबत अधिक विस्ताराने बोलेन असेही राज ठाकरे म्हणाले. 14 फेब्रुवारीच्या दुपारी सीआरपीएफच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर 40 जवान जागीच ठार झाले. यानंतर भारत आणि पाकिस्तान मध्ये सध्या तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत