पुलवामा हल्ल्यानंतर मोठा निर्णय, आता CRPF च्या जवानांसाठीही विमानसेवा

नवी दिल्ली : रायगड माझा वृत्त 

Related image

पुलवामा हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे आता सीआरपीएफ जवानांनाही श्रीनगरहून दिल्लीला जाण्यासाठी विमानसेवा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्ली-श्रीनगर, श्रीनगर-दिल्ली, जम्मू-श्रीनगर आणि श्रीनगर-जम्मू प्रवासासाठी ही सेवा असेल. सीआरपीएफच्या 7,80,000 जवानांना याचा फायदा होईल. सीआरपीएफचे जवान सुट्टीवर जातान देखील या सेवेचा फयादा मिळाणार आहे.

आत्तापर्यंत फक्त लष्करी जवानांसाठीच ही सेवा होती. CRPF च्या जवानांना बसने प्रवास करावा लागत होता. त्यांसाठी प्रचंड सुरक्षाव्यवस्था द्यावी लागत होती आणि जोखीमही प्रचंड होती. त्यातच पुलवामा घटनेनंतर या जवानांना विमानसेवा नसल्याबद्दल प्रचंड टीका झाली होती. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्रालयाने तातडीने हा निर्णय घेतला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत