पूजा चव्हाण प्रकरणावर संजय राठोड काढणार पत्रक, २४ तासात मांडणार बाजू

मुंबई : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त 

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला आता राजकीय रंग चढू लागलाय. शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचा या प्रकरणाशी थेट हात आहे असा आरोप भाजपने केला होता. हे प्रकरण उघड झाल्यापासून मंत्री राठोड हे नोट रिचेबल आहेत. पण आता राठोड या प्रकरणावर पत्रक काढणार अशी माहिती समोर आली आहे.

पूजाच शवविच्छेदन पुण्यातील ससून रुग्णालयात करण्यात आलय. ससून रुग्णालयाच्या प्राथमिक अहवालानुसार डोक्याला अणि मणक्याला मार लागल्याने पूजा चव्हाणचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे. या सर्व प्ररकरणात शिवसेनेच्या मंत्र्याच नाव असल्याने सरकारवर विरोधी पक्षाकडून टीकेची झोड उठवली जातीये. याच प्रकरणी संजय राठोड पुढच्या २४ तासात पत्रक काढणार आहेत अशी माहिती समोर आली आहे.

शिवसेनेने या मुद्द्यावर लक्ष घालायला सुरुवात केली असून राठोड या पत्रकात आपली बाजू मांडू शकतात, यातील सत्य परिस्थिती काय आहे, व्हायरल झालेल्या ऑडीओ क्लिप काय होत्या तसेच पूजा चव्हाण सोबत त्यांचे काय संबंध होते या सर्वांविषयी आपली बाजू राठोड या पत्रकात मांडू शकतात. त्यामुळे या पत्रकानंतर नक्की काय बाहेर येत अणि विरोधी पक्ष यावर काय भूमिका घेत हे पाहावं लागेल.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत