पूर्व राज्‍यमंत्री संगीता यादव यांना सासरच्‍यांकडून जिवंत जाळण्‍याचा प्रयत्‍न, उपचारासाठी वाराणसीला हलवले

रायगड माझा वृत्त 

जौनपूर- पूर्व राज्‍यमंत्री संगीता यादव यांना सासरच्‍या मंडळींनी जिवंत जाळून त्‍यांच्‍या हत्‍येचा प्रयत्‍न केला. मीडिया रिपोर्ट्सअनूसार, संगीताचा आरोप आहे की, त्‍या खोलीत झोपलेल्‍या असताना त्‍यांचे हातपाय बांधण्‍यात आले व नंतर त्‍यांच्‍यावर रॉकेल ओतून त्‍यांना पेटवण्‍यात आले. गंभीर स्थितीत असलेल्‍या संगीता यांना उपचारासाठी वाराणसी येथे हलवण्‍यात आले आहे. रविवारी रात्री जौनपूर जिल्‍ह्यातील विठुआ कला येथे ही घटना घडली.

किंचाळ्या ऐकताच खोलीत धावत आली जाऊ
– रिपोर्ट्स अनूसार, संगीताच्‍या खोलीतून किंचाळ्या ऐकू येताच संगीता यांच्‍या जाऊन घाबरतच खोलीकडे धाव घेतली. तेथे त्‍यांनी संगीता यांना जळताना पाहिले.
– त्‍यानंतर पोलिसांचे म्‍हणणे आहे की, 100 डायरवरून याची सूचना मिळताच ते घटनास्‍थळी दाखल झाले.
– जिल्‍हा रूग्‍णालयात प्राथमिक उपचार केल्‍यानंतर त्‍यांना वाराणसीला हलवण्‍यात आले. डॉक्‍टरांचे म्‍हणणे आहे की, आगीत त्‍यांचे शरीर 10 टक्‍के जळाले आहे.


दोन वर्षांपूर्वी झाला विवाह
– संगीता यांचे माहेर मछलीशहर पोलिस ठाण्‍याच्‍या हद्दीतील कताहित गावात आहे. 2016 मध्‍ये बदलापूर येथील दुर्गेश यादव यांच्‍यांशी त्‍यांचा विवाह झाला.
– त्‍यांच्‍या विवाहात शिवपाल यादवसह अनेक दिग्‍गज सहभागी झाले होते. संगीता आपल्‍या पत्‍नीसह लखनऊ येथे राहतात. तीन दिवसांपूर्वीच त्‍या आपल्‍या सासर विठुआ कला येथे आल्‍या होत्‍या.
– रिपोर्ट्सअनूसार, संगीता यांनी सासू, सासरे आणि पतीवर आरोप केले आहेत. संगीता यांनी सांगितले आहे की, रविवारी रात्री त्‍या झोपलेल्‍या असताना बळजबरी त्‍यांना एका खोलीत बोलावण्‍यात आले व तेथे हाथ पाय बांधुन त्‍यांना पेटवण्‍यात आले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत