पृथ्वी शॉने ठोकला स्विगी व फ्रीचार्जवर १ कोटीचा दावा

नवी दिल्ली : रायगड माझा ऑनलाईन 

विंडीज विरुध्दच्या पहिल्या कसोटीत पदार्पणातच शतक झळकावण्याचा विक्रम केला. पृथ्वीने रणजी, दुलीप ट्रॉफी आणि कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावण्याचा विक्रम केला. पृथ्वीच्या फलंदाजीची शैली ही सचिनच्या शैलीशी मिळती जुळती आहे तसेच त्याची देहयष्टीही सचिनसारखी आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना तो फलंदाजी करताना सचिनची आठवण येते.

पृथ्वी तसा प्रकाशझोतात हॅरिस शिल्डमध्ये ५४६ धावा केल्यानंतच आला होता. आता तो वरिष्ठ राष्ट्रीय संघातून खेळतो. त्यामुळे त्याचे मार्केटिंग आता एक व्यावसायिक कंपनी करते. ही व्यावसायिक कंपनी नुकतीच प्रकाशझोतात आली. त्यांनी पृथ्वी शॉच्या वतीने स्विगी आणि फ्रीचार्ज या कंपन्यांविरोधात पृथ्वी शॉच्या संमतीशिवाय त्याच्या नावाचा आणि ब्रँडचा वापर त्यांनी आपली जाहिरात करण्यासाठी कल्पकतेने वापर केला म्हणून या कंपन्यांना प्रत्येकी १ कोटी रुपयाचा दावा ठोकला आहे.

विंडीज विरुध्द ज्यावेळी पृथ्वीने शतक झळकावले त्यावेळी पृथ्वीचे अभिनंदन करणाऱ्या ट्विटचा सोशल मीडियावर पूरच आला होता. त्यातच स्विगी आणि फ्रिचार्ज यासारख्या व्यावसायिक कंपन्यांच्या अधिकृत ट्विटर हँडेलवरून देखील पृथ्वीचे अभिनंदन करण्यात आले. पण, पृथ्वीची मार्केटिंग टिम बेसलाईन व्हेंचर्सने या कंपन्यांनी पृथ्वीच्या नावाचा वापर करुन कल्पकतेने आपली जाहिरात केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी पृथ्वीचे नाव त्यांच्या परवानगीशिवाय वापरल्याप्रकरणी या कंपन्यांविरोधात तब्बल १ कोटीचा दावा दाखल केला आहे. त्यांच्या मते सध्या ज्या कंपनी पृथ्वीच्या ब्रँड नेमसाठी  पैसे देत आहेत. तसेच भविष्यात जे त्याच्या ब्रँड नेमसाठी पैसे देण्यास तयार आहेत त्यांच्या दृष्टीने हे अयोग्य आहे.

दरम्यान, स्विगी आणि फ्रिचार्जने त्यांचे या संदर्भातील टि्वट हटवले आहेत. अमुलनेही अशाच प्रकारे पृथ्वीचे अभिनंदन केले होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत