पेट्रोल-डिझेल दरवाढी निषेधार्थ म्हसळ्यात काँग्रेसचा मोर्चा

म्हसळा : निकेश कोकचा

देशातील प्रचंड इंधन वाढीमुळे दिवसेंदिवस महागाईचा आगडोंब उफाळात असून सर्वसामान्य जनतेचा कंबरडे पार मोडून निघाले आहे.या इंधन वाढीचा निषेध करण्यासाठी आज संपूर्ण देशात काँग्रेस ने भारत बंदचे आवाहन केले आहे.म्हसळा तालुका काँग्रेस च्या वतीने तालुका अध्यक्ष डॉ.मुईज शेख यांच्या नेतृत्वाखाली ग्रामिण रुग्णालय ते तहसिल कार्यालय पर्यंत वाढत्या इंधन वाढीच्या निषेधार्थ आणि सरकारच्या विरोधात घोषणा देत मोर्चा काढण्यात आला.

तहसीलदार रामदास झळके यांना निवेदन देण्यात आले.या प्रसंगी तालुका अध्यक्ष डॉ.मुईज शेख,माजी अध्यक्ष महादेव भिकू पाटिल, तालुका प्रमुख नंदू शिर्के,सलाम हालडे, रफिक घरटकर,मुकादम,इब्राहिम कासार,शाहिद उकये, माजी नगराध्यक्ष दिलीप कांबळे, अकमल कादिरी  तालुक्यातील काँग्रेस चे कार्यकर्ते,रिक्षा चालक-मालक काही प्रमाणात सहभागी झाले होते.बंदचा रोजच्या दैनंदिन जीवनावर मात्र काहीही परिणाम झाल्याचे दिसत नव्हते,सर्व व्यवहार नेहमीप्रमाणे सुरळीत सुरु होते, दळणवळण सुरु होते.पोलिस निरीक्षक प्रविण कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस चोख ठेवण्यात आली होती.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत