पेट्रोल-डिझेलची लांब उडी, इंधन दरात मोठी वाढ

मुंबई : रायगड माझा वृत्त 

पेट्रोल-डिझेलच्या किमती दिवसेंदिवस हाताबाहेर जात आहेत. कारण आज पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ झाली आहे. आज पेट्रोल 48 पैशांनी तर डिझेल 55 पैशांनी महागलं आहे. त्यामुळे मुंबईत आज पेट्रोल 87.39 रुपये प्रतिलिटर आणि डिझेल 76.51 रुपये प्रतिलिटरवर पोहोचलं आहे.

त्यामुळे सर्वसामान्यांच्या संतापाचा पाराही दिवसेंदिवस वाढत आहे. काल पेट्रोलमध्ये 19 पैशांनी तर डिझेलमध्ये 21 पैशांनी वाढ झाली होती. आज त्यामध्ये पुन्हा मोठी वाढ झाली.या दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसनं 10 सप्टेंबरला भारत बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये विरोधीपक्षांसह अनेक सामाजिक संघटनांनीदेखील सहभागी होण्याचं आवाहन काँग्रेसकडून करण्यात आलं.

7 दिवसात पेट्रोल 1 रु 30 पैशांनी महागलं

गेल्या सात दिवसात पेट्रोल सातत्याने महागतंय. या महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच 1 सप्टेंबरला मुंबईतील पेट्रोल दर 86.09 रुपये प्रति लिटर इतका होता. आज हाच दर 87.39 रुपये झाला आहे. त्यामुळे गेल्या सात दिवसात पैशात वाढणाऱ्या पेट्रोलमध्ये प्रत्यक्षात 1 रुपये 30 पैशांची वाढ झाली आहे.महाग पेट्रोल मिळणाऱ्या शहरांच्या यादीत अमरावती पहिल्या, सोलापूर आणि औरंगाबाद दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत