पेट्रोल, डिझेलच्या दरात पुन्हा वाढ

नवी दिल्ली : रायगड माझा वृत्त  

आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाचे भाव वाढू लागल्याने दिल्लीत पेट्रोलचा दर काल दोन महिन्यांत प्रथमच प्रतिलिटर ७७ रुपयांवर गेला. दिल्लीत काल पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर ९ पैसे वाढ होऊन तो ७७.०६ रुपयांवर गेला. याच वेळी डिझेलच्या दरात प्रतिलिटर ६ पैसे वाढ होऊन तो ६८.५० रुपयांवर गेला.

देशातील सर्व महानगरे आणि राज्यांच्या राजधानींशी तुलना करता दिल्लीत पेट्रोल सर्वांत स्वस्त आहे. स्थानिक कर अथवा मूल्यवर्धित कर कमी असल्याने दिल्लीत इंधनाचा दर कमी आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाचे भाव ३० जुलैपासून वाढू लागले आहेत. यामुळे मागील ९ दिवसांत पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर ९० पैसे तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर ८८ पैसे वाढ झाली आहे. याआधी ९ जूनला पेट्रोलचा दर प्रतिलिटर ७७.०२ रुपयांवर गेला होता.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत