पेट्रोल दरवाढीचं विघ्न हटेना, मोदींनी बैठक बोलावली

मुंबई : रायगड माझा वृत्त 

पेट्रोल-डिझेल दरवाढीचं विघ्न अद्याप दूर झालेलं नाही. आजही इंधन दरात वाढ झाली आहे. पेट्रोल 28 पैशांनी तर डिझेल 22 पैशांनी महागलं आहे. मुंबईतील आजचा पेट्रोलचा दर 88.67 तर डिझेल 77.82 रुपये प्रति लिटर इतका आहे. देशातील सर्वात महाग पेट्रोल परभणीत आहे. परभणीत पेट्रोलचा दर 90.45 रुपये तर डिझेल 78.34 रुपये लिटर आहे. त्यामुळे पेट्रोल दर वेगाने शंभरीकडे वाटचाल करत आहेत.या महिन्याच्या सुरुवातीपासून एखादा दिवस वगळता सलग पेट्रोल दरात वाढ होत आहे.

दरम्यान महाग पेट्रोल मिळणाऱ्या शहरांमध्ये नांदेडचा दुसरा नंबर लागला आहे. नांदेडमध्ये आजचा पेट्रोलचा दर 90.25 रुपये इतका आहे. तर डिझेल 78.17 रुपये लिटर आहे.या यादीत अमरावती तिसऱ्या नंबरवर आहे. अमरावतीत आजचा पेट्रोलचा दर 89.92 रुपये इतका तर डिझेल 79.10 रुपये लिटर आहे.

पंतप्रधानांनी बैठक बोलावली

पेट्रोल-डिझेलचे वाढते दर, डॉलरच्या तुलनेत घटणारं रुपयाचं मूल्य यामुळे मोदी सरकार टीकेचे धनी होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी अर्थव्यवस्थेच्या सद्यस्थितीवर बैठक बोलवली आहे. या बैठकीला अर्थमंत्री अरुण जेटलींसह महत्त्वाचे नेते उपस्थित असतील.

महत्त्वाच्या शहरातील पेट्रोलचे दर

 • मुंबई : पेट्रोल- 88.67 रुपये । डिझेल 77.82 रुपये
 • परभणी : पेट्रोल 90.45 रुपये । डिझेल 78.34 रुपये
 • नांदेड : पेट्रोल- 90.25 रुपये । डिझेल 78.17 रुपये
 • अमरावती : पेट्रोल – 89.92 । डिझेल – 79.10
 • सोलापूर : पेट्रोल – 89.72 । डिझेल – 78.44
 • औरंगाबाद : पेट्रोल 89.71 रुपये । डिझेल 78.88 रुपये
 • नाशिक : पेट्रोल 89.04 रुपये । डिझेल 76.98रुपये
 • जळगाव : पेट्रोल 89.63 रुपये । डिझेल 77.55 रुपये
 • नंदुरबार : पेट्रोल 89.52रुपये । डिझेल 77.46 रुपये
 • नागपूर : पेट्रोल 89.15 रुपये । डिझेल 78.74 रुपये
 • पुणे : पेट्रोल 88.45 रुपये । डिझेल 76.42 रुपये
 • धुळे : पेट्रोल 88.59 रुपये । डिझेल 76.56 रुपये
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत