पेणमधील आदिवासी आश्रमशाळेतील १८ विद्यार्थ्यांना विषबाधा?

पेण : रायगड माझा वृत्त 

पेण तालुक्यातील वरसई येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रम शाळेतील 18 विद्यार्थ्यांना मळ मळ व उलटी होण्याचा त्रास जाणवू लागल्याने या विद्यार्थ्यांना पेण येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांमध्ये दुसरी ते बारावीमध्ये शिकणाऱ्या 15 मुलींचा आणि  तीन मुलांचा समावेश आहे. 

पेण तालुक्यातील वरसई येथील आदिवासी आश्रम शाळेतील र्विद्यार्थ्यांना आज सकाळी दूध प्यायला नंतर मळमळ तसेच थंडी तापचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांना पेण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र पेण उपजिल्हा रुग्णालयाने मुलांना विषबाधा झाली की वायरल ताप या विषयाला अधिकृत दुजोरा दिला नाही. या विद्यार्थ्यांवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची तब्बेत व्यवस्थित असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान या सर्व विद्यार्थ्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी लॅबमध्ये पाठविण्यात आले असल्याचे उपजिल्हा रुग्णालयाततील वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित पाटील यांनी सांगितले. रक्ताचे रिपोर्ट आल्यानंतर आजाराचे कारण स्पष्ट होईल असे देखील डॉ. पाटील यांनी सांगितले.
यावेळी पेणचे तहसीलदार अजय पाटणे,पोलीस निरीक्षक धनाजी क्षीरसागर, आदिवासी विकास प्रकल्पाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी  डी. डी. काळपांडे ,पर्यवेक्षक अनंत पाटील व तहसीलदार अजय पाटणेपंचायत समिती सभापती स्मिता पेणकर यांनी रुग्णलयात जाऊन विदयार्थ्यांची विचारपूस आणि आश्रम शाळेची देखील पाहणी केली.या घटनेमुळे पेण तालुक्यात खळबळ उडाली असून पुन्हा एकदा आदिवासी आश्रम शाळेच्या कार्यपद्धतीवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

या विद्यार्थ्यांना झालाय त्रास 

हर्षदा कमलाकर वाघ (वय10 वर्षे), सीता गौतम माडे (वय11 वर्षे), रोशनी बामा भला ,(वय16 वर्षे) रसिका नाग्या सुतक (वय10 वर्षे), भारती रामा सुतक(वय15 वर्षे) , महेश तुकाराम वीर (वय 13 वर्षे) , मंगळ्या राघ्या जाधव (वय 16 वर्षे),रोशन नारायण दरवडा(वय 13 वर्षे) , प्रियांका जयेश ठोंबरा(वय 13 वर्षे) , दिव्या बाळू आवाटे(वय 13 वर्षे) , अस्मिता चांगु वाघ (वय 7 वर्षे), दिव्या पांडू दोरे(वय 17 वर्षे) , गीता रमेश वाघ(वय 13 वर्षे) , जयश्री पांडू माडे (वय 11 वर्षे), चित्रा लहू ठोंबरा(वय 8 वर्षे) , प्रमिला वामन वाघ (वय 12 वर्षे), मानसी नारायण (वय 12 वर्षे)दरवडा ,करिना जयेश ठोंबरा(वय 12 वर्षे)   
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.