पेणमध्ये भररस्त्यात गोळीबार करुन तरुणाची आत्महत्या

पनवेल नेरे येथे राहणाऱ्या तेजस फडके (वय २५) या तरुणाने सोमवारी रात्री पारिजात सोसायटी परिसरातील कारमेल शाळेजवळ गोळीबार केला.

पनवेल : रायगड माझा वृत्त

पेणमधील पारिजात सोसायटी परिसरात गोळीबाराची धक्कादायक घटना समोर आली आहे. २५ वर्षांच्या तरुणाने सोमवारी रात्री भररस्त्यात गोळीबार करुन पळ काढला. मात्र, काही वेळाच त्याने देखील आत्महत्या केली आहे. या प्रकरणाचा पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

पनवेल नेरे येथे राहणाऱ्या तेजस फडके (वय २५) या तरुणाने सोमवारी रात्री पारिजात सोसायटी परिसरातील कारमेल शाळेजवळ गोळीबार केला. तेजस हा मद्यधूंद अवस्थेत होता. तिथून पळून गेल्यावर त्याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. त्याचा मृतदेह पेणमधील पशुवैद्यकीय रुग्णालयाजवळ एका कारमध्ये सापडला. या संपूर्ण घटनेचा पोलिसांनी तपास सुरु केला आहे. तेजस तिथे काय करत होता, त्याने गोळीबार कोणावर केला, याबाबतचा तपशील अद्याप समजू शकलेला नाही
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत